शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर : रशियात दहशतवादी हल्ला, १३३ लोकांना मारले; इसिसने घेतली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 06:46 IST

रशियात राॅक बॅंड शोसाठी जमलेल्या प्रेक्षकांवर अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १३३ वर पोहोचली. इस्लामिक स्टेट ग्रुपने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याप्रकरणी ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. 

पुतिन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर काही दिवसांतच हा हल्ला झाला. इसिसच्या अफगाणिस्तानमधील शाखेने रशियात हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती आम्ही रशियाला दिली होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. रशियन रॉक बँडचा कार्यक्रम ऐकण्यासाठी क्रॉकस सिटी हॉलमध्ये शेकडो प्रेक्षक उपस्थित होते. सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करताच प्रेक्षक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हल्लेखोरांनी प्रेक्षकांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर लागलेल्या आगीत  हॉलची बाल्कनीही कोसळली. 

रशियात झालेले दहशतवादी हल्ले२००२ : मॉस्कोच्या दुब्रोवका थिएटरमध्ये ४० ते ५० सशस्त्र चेचेन्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात १७० जण ठार झाले होते.२००६ : बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू.मार्च २०१० : माॅस्कोच्या मेट्रो स्थानकांत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ३८ जण ठार झाले होते.ऑक्टोबर २०१५ : रशियन विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात २२४ जणांचा मृत्यू झाला होता. 

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला निषेधया हल्ल्याचा तीव्र निषेध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की, या हल्ल्यामुळे रशियातील नागरिकांची मोठी हानी झाली असून, आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही रशियातील हल्ल्याचा निषेध केला. 

टॅग्स :russiaरशियाTerror Attackदहशतवादी हल्ला