उत्तर कॅलिफोर्नियातील वणव्यामुळे 800 घरे नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:45 PM2018-07-31T13:45:46+5:302018-07-31T13:46:14+5:30

या आगीमुळे आतापर्यंत 6 लोकांचे प्राण गेले आहेत. या मृतांमध्ये 2 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 70 वर्षांची एक महिला आणि तिची दोन नातवंडे यांचा समावेश आहे. सहाव्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

Termed as 9th most destructive in history, Northern California wildfire destroys 800 plus homes | उत्तर कॅलिफोर्नियातील वणव्यामुळे 800 घरे नष्ट

उत्तर कॅलिफोर्नियातील वणव्यामुळे 800 घरे नष्ट

Next

वॉशिंग्टन- उत्तर कॅलिफोर्नियामधये लागलेल्या वणव्यामुळे 800 घरे नष्ट जाली असून 20 हजार लोकांना त्यामुळे स्थलांतर करावे लागले आहे. आजवरच्या वणव्यांमध्ये हा वणवा 9 व्या क्रमांकाचा सर्वात संहारक वणवा असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमुळे 1 लाख एकर जागेचे नुकसान झाले आहे. या जागेवरील झाडे व पशूपक्षी जळून खाक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.



 


या आगीमुळे आतापर्यंत 6 लोकांचे प्राण गेले आहेत. या मृतांमध्ये 2 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 70 वर्षांची एक महिला आणि तिची दोन नातवंडे यांचा समावेश आहे. सहाव्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या आगीमुळे 19 लोक बेपत्ता असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले आहे. 



23 जुलै रोजी हा वणवा भडकला. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने पसरत जाणाऱ्या आगीने 1 लाख 3 हजार 772 एकर जागेचे नुकसान करत 818 घरे खाक केली. त्याचप्रमाणे 167 घरांचे नुकसानही झाले आहे. 3 व्यावसायिक इमारतींचेही या आगीमुळे नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 3600 कर्मचारी प्रयत्न करत असून 17 हेलिकॉप्टर्स, 334 फायर इंजिन्स, 68 बुलडोजर्स, 65 वॉटर टेंडर्सचा उपयोग केला जात आहे.

Web Title: Termed as 9th most destructive in history, Northern California wildfire destroys 800 plus homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.