...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:59 PM2019-08-20T17:59:32+5:302019-08-20T17:59:46+5:30

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारताच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे.

tensions with india pakistan flag is visible on hindu houses and temples of this city | ...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे

...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे

Next

नवी दिल्लीः गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील काही भागातल्या घरं आणि दुकानांवर पाकिस्तानी झेंडे डौलानं फडकताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे फक्त दुकानं आणि घरांवरच नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या कळसावरही पाकिस्तान झेंडे दिसत आहेत. खरं तर भारतातल्या गुजरात राज्यातून पाकिस्तानला जोडणाऱ्या कच्छ नियंत्रण रेषे(Kuchh Border)जवळ हा भाग आहे. या नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात हिंदू बहुसंख्येनं (Pakistani Hindu) वास्तव्याला आहेत. थारपारकर हा जिल्हा पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये आहे. जिथे लाखोंच्या संख्येनं हिंदूंची लोकसंख्या आहे. सिंध प्रांता(Sindh Province)तील थारपारकर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 17 लाखांच्या घरात आहे. ज्यात 41 टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. 2017च्या जनगणना अहवालात ही माहिती आहे.

परंतु बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या या जिल्ह्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या जास्त असल्याचं सांगितलं आहे. गुजरातला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील शेरावाली मातेच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकतो आहे. थारपारकरमधल्या हिंदूंच्या घर, गाड्या आणि काही मंदिरांवर पाकिस्तानी झेंडे दिसण्याचंही वेगळंच कारण आहे. खरं तर भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द करून त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भारताविरोधात राग आळवला जातोय.


पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारताच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तिथली जनता आणि नेत्यांनी मिळून भारताचा झेंडा, नकाशासह मोदींचा पुतळाही जाळला होता. पाकिस्तानप्रति निष्ठा दाखवण्यासाठी हे हिंदू भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. पाकिस्तानमधले हिंदू पूर्णतः पाकिस्तानी सेना आणि काश्मिरी लोकांबरोबर आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधल्या हिंदूबहूल सिंध भागात जागोजागी पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत. पाकिस्तानमधले हिंदू देशाप्रति असलेलं समर्थन आणि भावना दाखवण्यासाठी घर आणि गाड्यांवर पाकिस्तानचे झेंडे फडकावत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतरही भारत आणि पाकिस्तानमधले संबंध बिघडले होते. त्यावेळी सिंध प्रांतातील हिंदूंनी भारताविरोधात भूमिका घेतली होती. 

कसा आहे थारपारकर भूभाग?
गुजरातच्या थार वाळवंटाच्या नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेला हा एक मागास भाग आहे. यूएन रिपोर्टनुसार, थारपारकरमधली 87 टक्के लोकसंख्या ही अत्यंत हलाखीत दिवस काढत आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 80 लाख हिंदू आहेत. ज्यातील हिंदूंचा एक मोठा समूह थारपारकर भागात राहतो. विशेष म्हणजे दशकभरात इथे कोणत्याही सांप्रदायिक दंगली झालेल्या नाहीत. थारपारकर जिल्ह्यातील एका मोठ्या भागाचं नाव काश्मीर आहे. या काश्मीर चौकात नेहमीच मोठ्या यात्रा आणि सण-उत्सव साजरे केले जातात. या भागात हिंदूंची अर्ध्या डझनांहून अधिक प्रमुख मंदिरं आहेत. पाकिस्तानमधला थारपारकर हा जिल्हा पाकिस्तानमधल्या हिंदू धर्म आणि देश दोघांनाही वेगवेगळं ठेवत असून, देशाप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी इथले नागरिक नेहमीच पुढे असतात. 

Web Title: tensions with india pakistan flag is visible on hindu houses and temples of this city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.