दोन हेलिकॉप्टर्सच्या धडकेत दहा ठार
By Admin | Updated: March 10, 2015 23:28 IST2015-03-10T23:28:15+5:302015-03-10T23:28:15+5:30
उत्तर अर्जेंटिनामध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेत धडक होऊन सर्व दहाही जण ठार झाले, असे ला रिओजा प्रांताचे सरकारी प्रवक्ते डिझेल कुनिओ

दोन हेलिकॉप्टर्सच्या धडकेत दहा ठार
ब्युनोस आयर्स : उत्तर अर्जेंटिनामध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेत धडक होऊन सर्व दहाही जण ठार झाले, असे ला रिओजा प्रांताचे सरकारी प्रवक्ते डिझेल कुनिओ यांनी सांगितले. अपघात सोमवारी ला रिओजाच्या पहाडी भागात झाला.
फ्रेंच रियालिटी शोचे चित्रीकरण सुरू असताना हा अपघात झाल्याचे आणखी एक प्रवक्ते होरासिओ अलारकोन यांनी सांगितले. या अपघातात फे्रंचचे तीन आॅलिंपिक खेळाडू ठार झाल्याच्या वृत्ताला फ्रेंचच्या अध्यक्षीय कार्यालयाने दुजोरा दिला. मृतांमध्ये दोन्ही हेलिकॉप्टरचे अर्जेंटिनाचे पायलटही ठार झाले. हेलिकॉप्टर ‘ड्रॉपड्’ या रियालिटी शोचे चित्रीकरण करीत होते. शोमध्ये प्रसिद्ध व्यक्तींना प्रतिकूल भूप्रदेशात हेलिकॉप्टरने नेले जाते व त्यांनी अन्न आणि निवारा शोधण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे चित्रीकरण केले जाते. (वृत्तसंस्था)