बारा तासांत दहा बालके रहस्यमयरीत्या मृत्युमुखी
By Admin | Updated: February 10, 2015 22:56 IST2015-02-10T22:56:08+5:302015-02-10T22:56:08+5:30
बांगलादेशातील एका सरकारी रुग्णालयात अवघ्या बारा तासांत दहा बालकांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे

बारा तासांत दहा बालके रहस्यमयरीत्या मृत्युमुखी
ढाका : बांगलादेशातील एका सरकारी रुग्णालयात अवघ्या बारा तासांत दहा बालकांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिल्हेट शहरातील उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा प्रकार घडला.
मृतांपैकी पाच मुले नवजात असून, त्यांचा कालच जन्म झाला होता. उर्वरित मृतांत एका दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘श्वासोच्छ्वासाची समस्या, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत आणि न्युमोनिया यामुळे नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचे दिसते. मात्र, घटनेच्या चौकशीसाठी आम्ही चार सदस्यीय समिती स्थापन केली असून या समितीत वरिष्ठ प्रोफेसरचा समावेश आहे. समितीला २४ तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे’, असे रुग्णालयाचे उपसंचालक अब्दुस सालेम यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)