विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका! शाळेने केले निलंबित
By Admin | Updated: June 22, 2017 14:27 IST2017-06-22T14:27:40+5:302017-06-22T14:27:40+5:30
आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब कहाण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब प्रेमकहाणी

विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका! शाळेने केले निलंबित
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 - आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब कहाण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब प्रेमकहाणी लंडनमध्ये उघडकीस आली आहे. येथील एक शिक्षिका आपल्याच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्यावार शालेय प्रशासनाने या शिक्षिकेला निलंबित केले असून, तिच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही शिक्षिका यापुढे कुठल्याही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवू शकणार नाही.
नजम खान असे या शिक्षिकेचे नाव आहे. विवाहित असलेली 36 वर्षीय नजम ब्रॅडफर्ड येथील टोंग हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. तिथेच ती एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. गेल्या 9 महिन्यांपासून त्याची प्रेमकहाणी सुरू होती. ही शिक्षिका फेसबूक आणि अन्य चॅटिंग अॅपवर या विद्यार्थ्यासोबत गप्पा मारायची. तसेच त्याला आपली नग्न छायाचित्रेही पाठवायची.
डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील या विचित्र प्रेमकहाणीची गोष्ट समोर आल्यावर नॅशनल कौन्सिल फॉर टीचिंग अँड लिडरशिपच्या एका चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत दोघांमधील संबंधाबाबतची माहिती समोर आली. दोघेही एकत्र हॉटेलमध्ये जात असत. मात्र या प्रकारामुळे सदर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसाना झाल्याचेही चौकशीत उघड झाले.