सुसाईड बॉम्बरला गाडीत लॉक करुन टॅक्सीचालकानं उडी मारली, तितक्याच ब्लास्ट झाला, मग..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:26 PM2021-11-15T18:26:21+5:302021-11-15T18:32:53+5:30

इंग्लंडच्या उत्तरेकडील लिवरपूर शहरात रविवारी महिला रुग्णालयाबाहेर कारमध्ये मोठा स्फोट झाला.

Taxi driver 'locked suicide bomber in car' moments before Liverpool hospital explosion | सुसाईड बॉम्बरला गाडीत लॉक करुन टॅक्सीचालकानं उडी मारली, तितक्याच ब्लास्ट झाला, मग..

सुसाईड बॉम्बरला गाडीत लॉक करुन टॅक्सीचालकानं उडी मारली, तितक्याच ब्लास्ट झाला, मग..

Next

इंग्लंडच्या लिवरपूलमध्ये टॅक्सी चालकाच्या धाडसामुळे अनेक लोकांचा जीव वाचला आहे. या टॅक्सी चालकाने एका संशयित दहशतवाद्याला त्याच्या गाडीत लॉक केले. काही वेळातच एक मोठा स्फोट झाला ज्यात सुसाईड बॉम्बरचा जागीच मृत्यू झाला. या टॅक्सी चालकाचं नाव डेविड पेरी असं आहे. स्फोटाच्या घटनेत डेविड पेरीही गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकांनी टॅक्सी ड्रायव्हरच्या धाडसाला सलाम करत म्हटलंय की, डेविड पेरी, द लिवरपूर हिरो. दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वत:च्या जीवाची बाजी लावली. त्याने आपल्या शहरातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गाडीतून उडी घेतली. डेविड पेरीचा मित्र स्टीफन थॉमस सांगतो की, डेविड माझा मित्र आहे. त्याने एका प्रवाशाची संशयित हालचाल ओळखली. त्यासाठी त्याने कार लॉक करुन बाहेर उडी मारली. संशयिताने स्वत:लाच उडवले परंतु माझा मित्र ठीक आहे. त्याला काही जखमा झाल्या आहेत. कानाचे पडदे फाटलेत. परंतु त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

तर तुझा मित्र धाडसी आहे. कार लॉक करुन त्याने उडी घेत अनेकांचे जीव वाचवले असं जे किट्स यांनी सांगितले. इंग्लंडच्या उत्तरेकडील लिवरपूर शहरात रविवारी महिला रुग्णालयाबाहेर कारमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत संशयिताचा मृत्यू झाला तर कारचालक गंभीर जखमी झाला. जो जखमी झाला त्याचं नाव डेविड पेरी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डेविड पेरीला त्यावेळी संशय झाला जेव्हा प्रवाशाने त्याला कैथेड्रल जाण्यास सांगितले परंतु मध्येच त्याने विचार बदलला आणि डेविड पेरीला महिला रुग्णालयाबाहेर थांबण्यास सांगितले. डेविडने पाहिले की त्या संशयिताच्या कपड्यातून वेगळ्या प्रकारचा प्रकाश दिसून येत होता. तो त्याच्यासोबत काहीतरी काम करत होता. लिवरपूर हॉस्पिटलबाहेर पोहचताच डेविड पेरीनं कार लॉक करत स्वत: गाडीतून उडी घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात डेविड पेरी गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या कानाचे पडदे फाटले. तर स्फोटात कारच्या चिंधड्या उडाल्या त्याचे काही भाग डेविडच्या शरीरात घुसले होते.  

Web Title: Taxi driver 'locked suicide bomber in car' moments before Liverpool hospital explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट