महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू

By Admin | Updated: June 16, 2017 03:25 IST2017-06-16T03:25:44+5:302017-06-16T03:25:44+5:30

युवकांमध्ये टॅटू करून घ्यायचा नाद असतोच. मग तो मुलगा असो की मुलगी, टॅटूच्या फॅशनच्या स्पर्धेत ते सहभागी होऊ इच्छितात; परंतु तुम्हाला हे माहिती आहे

Tattoos on the faces of women | महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू

महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू

यंगून : युवकांमध्ये टॅटू करून घ्यायचा नाद असतोच. मग तो मुलगा असो की मुलगी, टॅटूच्या फॅशनच्या स्पर्धेत ते सहभागी होऊ इच्छितात; परंतु तुम्हाला हे माहिती आहे का याआधीदेखील लोक टॅटू बनवायचे? म्यानमारमध्ये राहणाऱ्या महिला आपल्या चेहऱ्यावर टॅटू करून घ्यायच्या; परंतु त्या असे का करायच्या? म्यानमारमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिला आपल्या चेहऱ्याला पुरुषांच्या घाणेरड्या नजरांपासून संरक्षण म्हणून चेहऱ्यावर भीती वाटावी असे टॅटू करून घ्यायच्या. म्यानमारच्या राजाची गुलामी करायची वेळ येऊ नये म्हणूनही महिला टॅटू करून घ्यायच्या.

Web Title: Tattoos on the faces of women