शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 17:10 IST

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे.

काबूल - अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांसदर्भात एक ताजी आणि चिंताजनक बातमी आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनीअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाय ठेवला असल्याचे समजते. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तीन अधिकाऱ्यांनीही तालिबानी दहशतवादी काबुलच्या सीमेत घुसल्याची पुष्टी  केली आहे. यापूर्वी तालिबानने सर्व बॉर्डर क्रासिंगवर ताबा मिळवला आहे.

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. टोलो न्यूजनुसार, अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, 'काबूलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तन शांततेत होईल.' एवढेच नाही, तर काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलांची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

AP या वृत्तसंस्थेनुसार, तालिबानकडून वाटाघाटी करणारे काही लोक अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. ते तेथे सत्ता हस्तांतरणासंदर्भात चर्चा करतील.

तत्पूर्वी, तालिबानने निवेदन जारी केले होते, की काबुलवर ताकदीच्या जोरावर ताबा मिळविण्याची तालिबानची इच्छा नाही. आम्हाला सर्व काही ट्रांझिशन फेजने हवे आहे. तसेच, सत्ता परिवर्तन सहजतेने झाले, तर कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्त हाणी होणार नाही.

सैनिकांवर कारवाई करणार नाही -तालिबानी दहशतवादी काबूलमध्ये घुसल्याचे वृत्त येत असतानाच, तालिबाननेही एक निवेदन जारी केले आहे. यात, दहशतवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश करू नये आणि सीमेवर थांबावे, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर आपण नागरिक अथवा अफगाण सैन्यावर बदला घेण्याच्या भावणेतून कसल्याही प्रकारची कारवाई करणार नाही, असे आश्वासन देतो. याच बरोबर सर्वांना घरातच राहण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच कुणीही देश सोडण्याचाही प्रयत्न करू नये, असेही यात म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद