शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

100 हून अधिक नागरिकांचे तालिबानकडून अपहरण, महिलांसह मुलांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:00 IST

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे.

काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती अशरफ गणी यांनी दहशतवादी संघटनेबरोबर शस्त्रसंधी जाहीर केली होती. तरी सुद्धा दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे कृत्य करण्यात आले आहे. अपहरण करण्यात आलेल्या लोकांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. 

कुंदूज प्रांतातील प्रमुख मोहम्मद युसूफ अयूबी यांनी सांगितले की, सोमवारी दहशतवाद्यांनी रस्त्यावरुन जाणा-या तीन बसेस थांबविल्या आणि या बसेसमधील लोकांचे अपहरण केले. ही घटना खान आबाद जिल्ह्यात घडली. दहशतवादी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपात लपून बसले होते. यावेळी संधी पाहून त्यांनी बसेसवर हल्ला केला. सरकारी कर्मचारी किंवा सुरक्षा कर्मचारी यांच्यावर दहशतवाद्यांचा निशाणा होता, असे मोहम्मद युसूफ अयूबी यांनी सांगितले. तसेच, सूबे ताखारचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान अकताश यांनी सांगितले की, बदखशान आणि ताखर प्रांतातील अपहरण करण्यात आलेले बस प्रवासी आहेत. प्रवासी काबूलला जात असताना त्यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. 

दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेने अद्याप या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, .या घटनेमागे तालिबान संघटनेचा हात असल्याचे समजते.   

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादी