शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगात मान्यता मिळवण्यासाठी तालिबान धडपडतोय, पण परिवर्तन झालंय असं मानत नाही : जो बायडेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 20:13 IST

Afghanistan Taliban Crisis : रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवत देशाची सूत्रं घेतली होती हाती. तालिबाननं आपल्याला मान्यता देण्यात यावी असंही केलं होतं वक्तव्य.

ठळक मुद्देरविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवत देशाची सूत्रं घेतली होती हाती. तालिबाननं आपल्याला मान्यता देण्यात यावी असंही केलं होतं वक्तव्य.

तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवत देशाची सूत्रं आपल्या हाती घेतली. याच दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देशातून पलायन केलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तालिबाननं आंतरराष्ट्रीय समुदायानं आपल्याला मान्यता द्यावी असं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. "तालिबान संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठी धडपड करत आहे. परंतु तालिबान बदललाय असं मी मानत नाही," असं बायडेन म्हणाले. 

"तालिबान आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात त्याला मान्यता हवी आहे. परंतु तालिबान बदललाय असं मला वाटत नाही," असं महत्त्वपूर्ण वक्तव्य जो बायडेन यांनी केलं. एबीसी न्यूजच्या डॉर्ज स्टेफॅनोपॉल्स यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "तालिबान अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर जाऊ देईल का नाही याची भविष्यवाणी करता येणार नाही. परंतु भरवसा करता येईल असा तालिबान नाही. याकडे पाहता जोपर्यंत अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिक तोवर असतील जोवर त्या ठिकाणाहून अमेरिकन नागरिक सुरक्षित बाहेर पडणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

तारीख पुढे गेली तरी चालेल"अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य देशाच्या बाहेर जाईल ही निश्चित केलेली तारीख पुढे गेली तरी चालेल," असंही ते म्हणाले. सध्या जो बायडेन अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचा बचाव करताना दिसून येत आहेत.

इतक्या लवकर काही होईल अंदाज नव्हता"अमेरिकेच्या इंटेलिजन्सला या गोष्टीचा अंदाज नव्हता की हे सर्वकाही इतक्या लवकर होईल. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानच्या बाहेर गेल्यानंतर तालिबान पुन्हा तेजीनं डोकं वर काढू शकतो असा त्यांचा अंदाज होता," असंही बायडेन यांनी सांगितलं. दरम्यान, यानंतर अमेरिकेला आता आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष मोहीम चालववी लागत आहेत. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधील परिस्थिती ज्याप्रकारे एकदम बदलली त्यावरून अमेरिकन नागरिकही हैराण आहेत.

अफगाणिस्तानप्रकरणी जो बायडेन यांनी अनेक स्तरांवर टीका सहन करावी लागत आहे. आपण जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचं त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानEnglandइंग्लंडBoris Johnsonबोरिस जॉन्सनGermanyजर्मनीFranceफ्रान्स