शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Taliban Pakistan: पाकिस्तानने मोठ्या आशेने मदत पाठविली, तालिबान्यांनी केला अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:12 IST

Pakistan sending help in Afghanistan: मुजाहिदने सांगितले तालिबानी नेत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. मदत साहित्य आणणाऱ्या ट्रकबाबत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा संदेश त्यांनी दहशतवाद्यांना पाठविला आहे. अशा प्रकारच्या घटना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 

तालिबान (Taliban) राजवट आल्याने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. बाहेर पडता येत नसल्याने रोजगार बुडाला आहे. अनेकांच्या घरातील धान्य संपले आहे. या परिस्थितीमुळे तालिबानवर मेहेरबान असलेल्या आणि अफगाणिस्तानमुळे (Afghanistan) फायदा होईल या आशेवर असलेल्या पाकिस्तानने नागरिकांसाठी मदत पाठविली होती. परंतू तालिबानी दहशतवाद्यांनी अपमान केल्याने पाकिस्तान चिडला आहे. (Pakistan started humanitarian supplies to Afghanistan through Torkham)

तोरखम सीमेद्वारे पाकिस्तानने 17 ट्रक मदत साहित्य पाठविले होते. मात्र, तालिबानी सिक्युरिटी गार्डनी हे ट्रक सीमेवर थांबवत त्यावरील पाकिस्तानी झेंडे काढून टाकले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. पाकस्तानींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर तालिबानने वाद वाढत चालल्याचे पाहून आपल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. 

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद याने या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. जे लोक यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मुजाहिद म्हणाला. 

मुजाहिदने सांगितले तालिबानी नेत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. मदत साहित्य आणणाऱ्या ट्रकबाबत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा संदेश त्यांनी दहशतवाद्यांना पाठविला आहे. अशा प्रकारच्या घटना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 

अफगाणिस्तानला पाकिस्तानने पाठविलेल्या ट्रकमध्ये 65 टन साखर, तीन टन डाळ, 190 टन गव्हाचे पीठ, 11 टन खाद्यतेल आणि 31 टन तांदूळ होता. पाकिस्तानचे राजदूत मंसूर खान याने ट्विट करून म्हटले की,  पाकिस्तानने तोरखम येथून मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे. थंडीच्या काळात ब्लँकेट आणि टेंट देखील पाठविण्यात येणार आहेत. पाकिस्तानने याआधी सी 130 विमानातून 32 टन पीठ, 6 टन खाद्यतेल आदी सामुग्री अफगाणिस्तानात पाठविली होती. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान