शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Taliban: सिंग इज किंग! शिखांच्या विरोधापुढे तालिबान झुकला; गुरुद्वारावर पुन्हा निशान फडकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 15:14 IST

Taliban Restored Nishan Sahib At Gurdwara: पकतिया प्रांताताली पवित्र गुरुद्वारा थाल साहिब याच्या छतावर शिखांचा धार्मिक झेंडा लावण्यात आला होता. तो तालिबानींनी कब्जा करताच काढून टाकला होता. हा गुरुद्वारा शिख समुदायासाठी महत्वाचा आहे.

काबुल: अमेरिकेने अफगानिस्तानमधून (afghanistan) बाहेर पडण्यास सुरुवात केली आणि तिकडे पाकिस्तानच्या छत्राखाली दबा धरून बसलेल्या तालिबानी अतिरेक्यांनी (Taliban) एकेक प्रांत पुन्हा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युद्ध हे अफगानिस्तानच्या पाचवीला पुजलेले आहे. तालिबानी अतिरेकी एकेक करून सगळी कार्यालये, मोक्याची ठिकाणे ताब्यात घेत त्यांचा पांढरा झेंडा फडकवत आहेत. दुसरीकडे तालिबानींना रोखण्यासाठी अफगानचे सैनिक लढत आहेत. दरम्यान, शिखांनी जगभरातून विरोध करताच तालिबानने नमते घेतले आहे. (Nishan Sahib, which was removed by the Taliban from the roof of a Gurdwara in Afghanistan's eastern Paktia province, was restored with its "proper dignity" on Friday night, said President Indian World Forum, Puneet Singh Chandhok.)

पकतिया प्रांताताली पवित्र गुरुद्वारा थाल साहिब याच्या छतावर शिखांचा धार्मिक झेंडा लावण्यात आला होता. तो तालिबानींनी कब्जा करताच काढून टाकला होता. हा गुरुद्वारा शिख समुदायासाठी महत्वाचा आहे. त्यांचे गुरु नानक देव देखील येथे आले होते. तालिबानने हे निशान हटविताच जगभरातून शिख समुदायाकडून विरोध होऊ लागला होता. यावर तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने दावा केला की, निशान साहिब हटविण्यात आलेला नाही. परंतू त्याचा दावा काही मिनिटांतच फोल ठरला होता. निशान काढताना आणि काढल्यानंतरचे फोटो व्हायरल झाले होते. यामुळे तालिबानचे कृत्य उघड झाले होते.

चोहोबाजुंनी टीकेचा भडीमार झाल्यानंतर तालिबानने निशान साहिब पुन्हा होता त्या जागेवर फडकवला आहे. तालिबानच्या या कृत्यामुळे शिखांमध्ये खूप संताप पहायला मिळाला होता. या आधी व्हायरल झालेल्या फोटोंवरून गुरुद्वाऱ्यावरून निशान हटविण्यात आले होते, हे स्पष्ट दिसत होते. तालिबानवर दुसऱ्या धर्माचा अनादर करत असल्याचे आरोप याआधी होत होते. परंतू तालिबानने आपण बदलत असल्याचा दावा केला आहे. 

अफगानिस्तानच्या युद्धग्रस्त भागात दशकांपासून अल्पसंख्यांक शीख आणि हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत. पकतिया भागात 1980 पासून मुजाहिद्दीन आणि तालिबान हक्कानी गटाचे वर्चस्व होते. त्यांचा दहशतवाद एवढा होता की, अफगन सरकार देखील यात कधी पडत नव्हते. गेल्या वर्षी निदान सिंह सचदेव यांचे अपहरण करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या आधी सेवेसाठी ते आले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान