शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:12 IST

Afghanistan Crisis: तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबाननं कब्जा केल्यानंतर देशात आता परदेशी देशांना मदत करणाऱ्या स्थानिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. तालिबान्यांना हद्दपार करण्यासाठी अमेरिकन सैन्याची मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यास तालिबान्यांनी सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्याच्या साथीनं तालिबानमध्ये २० वर्षांपूर्वी सत्तापालट करण्यात आला होता. तालिबान्यांना सत्तेतून बेदखल करून अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापन करण्यात आलं होतं. तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता. ( Taliban search for people they believe worked with US and NATO forces in Kabul Airport)

'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात तालिबानकडून अमेरिका आणि नाटो सुरक्षा दलासोबत काम केलेल्या स्थानिक नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचा नमूद करण्यात आलं आहे. काबुल विमानतळावरील गर्दीत या नागरिकांचा शोध घेतला जात आहे आणि ते न सापडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या तालिबान्यांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे तालिबानचे इरादे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. 

यापुढे अफगाणिस्तानात... तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार?

माफी दिल्याचं जाहीर केल्यानंतरही तालिबानकडून झाडाझडतीतालिबानी नेत्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करून आजवर झालेल्या चुकांबाबत सर्वांना माफ केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. "आम्ही सर्वांना माफ केलं असून आता आमची कुणाही सोबत शत्रुत्व नाही. अफगाणिस्तानात उत्तम सरकार आम्ही देण्याची तयारी करत आहोत", असं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पण दुसरीकडे तालिबान्यांकडून घरोघरी झाडाझडती घेतली जात असून परदेशी सैन्यांना मदत करणाऱ्यांचा शोध तालिबानकडून घेतला जात आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका