शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:13 IST

Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते.

Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. यावेळी स्फोटात तालिबान सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. काबूलमधील या स्फोटात तालिबान सरकारमधील मंत्री खलील रहमान हक्कानी यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांच्या तीन अंगरक्षकांसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. निर्वासित मंत्रालयात हा हल्ला झाला. खोस्तहून आलेल्या एका समूहाला होस्ट करत असताना हा हल्ला झाला.

आतापर्यंतच्या तपासात जे समोर आले आहे, त्यानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर मंत्रालयात कसा पोहोचला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. खलील रहमान हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये निर्वासित आणि स्थलांतर मंत्री होते. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यानंतर कार्यवाहकच्या आधारावर ही जबाबदारी देण्यात आली होती. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे ते काका होते.

अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेले हक्कानी हे पश्तूनांच्या जदरान जमातीचे होते. अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. दरम्यान, ते गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानसोबत काम करत होते. त्याआधी हक्कानी यांचा काहीकाळ अल-कायदा संघटनेशीही संबंध होता. २००२ मध्ये हक्कानी यांना पक्तिया प्रांतात अल-कायदा संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेतेखलील रहमान हक्ककी हे अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. हक्कानी नेटवर्कची स्थापना खलील यांचा भाऊ जलालुद्दीन हक्कानी यांनी केली होती. हे नेटवर्क १९९० च्या दशकात तालिबान राजवटीत सामील झाले. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला तालिबानसाठी निधी उभारण्याच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते. खलील रहमान हक्ककी हे इराण, अरब राष्ट्रे आणि दक्षिण आशियातील विविध देशांतून तालिबानसाठी निधी गोळा करत होते.

अमेरिकेने घोषित केले होते दहशतवादीखलील रहमान हक्कानी यांना ९ फेब्रुवारी २०११ रोजी अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यांच्यावर ५ मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षीसही होते. अल-कायदाशी असलेले संबंध आणि तालिबानच्या सततच्या पाठिंब्यामुळेही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

काय आहे हक्कानी नेटवर्क?हक्कानी नेटवर्कचा अफगाणिस्तानात बराच प्रभाव आहे. एक काळ असा होता, जेव्हा या ग्रुपला अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचा पाठिंबा होता. त्यावेळी हा  ग्रुप सोव्हिएत युनियनविरुद्ध लढत होता, नंतर जेव्हा तो अमेरिकेसाठी अडचणीचा ठरला, तेव्हा सीआयए त्यांच्यापासून लांब राहिला आणि या ग्रुपला दहशतवादी म्हणून घोषित केले.हक्कानी ग्रुपवर अफगाणिस्तान, भारत आणि अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये मोठे हल्ले केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या ग्रुपला पाकिस्तानचाही पाठिंबा आहे.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय