काबूल : अफगाणिस्तानच्या एका गावात तालिबान आणि इसिस यांनी ५० जणांची हत्या केली. यातील बहुतांश लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले, तर काही लोकांचा शिरच्छेद करण्यात आला.उत्तरी सर-ए-पुल प्रांतात सियाद जिल्ह्यात हे भयंकर हत्याकांड घडवून आणले. मृतांत पुरुष, महिला आणि मुले यांचा समावेश आहे. प्रांतीय गव्हर्नरच्या प्रवक्त्यांनी जबीहुल्लाह अमानी यांनी सांगितले की, इसिस आणि तालिबानने हे भीषण हत्याकांड मिर्जवालांग गावात घडवून आणले.शेर मोहम्मद गजानफार यांच्या नेतृत्वात तालिबान आणि इसिसच्या डझनभराच्या समूहाने हा हल्ला केला. या भागावर त्यांनी ताबा मिळविला आणि नागरिकांच्या हत्या केल्या. बळींचा हा आकडा वाढू शकतो. कारण, ज्या भागात ही दुर्घटना घडली आहे तिथे टेलिफोनचे नेटवर्क काम करीत नाही.मिर्जवालांग गावावर ताबा मिळविल्याच्या वृत्ताला तालिबानच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला असला तरी आम्ही गावकºयांची हत्या केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
तालिबान, इसिसकडून ५० जणांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:43 IST