शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:55 IST

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. राजधानी काबूलसह अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर, तालिबानी सैन्याने किमान १५ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले.

भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या जवळीकतेमुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर असताना, पाकिस्तानने राजधानी काबूलसह अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्याला तालिबानने चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरात, हेलमंड प्रांतात किमान १५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. तालिबानी सैनिकांनी अनेक पाकिस्तानी चौक्याही ताब्यात घेतल्या. अनेक सीमावर्ती प्रांतांमध्ये हिंसक चकमकी झाल्याची माहिती समोर आली आहे.

“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम हेलमंड प्रांतीय सरकारचे प्रवक्ते मावलावी मोहम्मद कासिम रियाझ यांनी सांगितले की, बहरामपूरमधील डुरंड रेषेजवळ रात्रीच्या वेळी झालेल्या कारवाईत किमान १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानी चौकी ताब्यात घेण्यासोबतच मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानी हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. दरम्यान, तालिबानी दहशतवाद्यांनी हेलमंड, कंधार, जाबुल, पक्तिका, पक्तिया खोस्त, नांगरहार आणि कुनार येथे पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली, जे सर्व पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहेत.

वृत्तानुसार, अफगाण सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या. कुनार आणि हेलमंडमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. पक्तिया आणि रब जाजी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण सीमा दलांमध्ये भीषण संघर्ष सुरू झाला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रेही हिसकावून घेतली आहेत. स्पिना शागा, गिवी, मनी जाभा आणि इतर भागातही युद्ध सुरू झाले आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानला आवाहन केले

९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिया येथे टीटीपी प्रमुख नूर अली मेहसूदला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानने आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. भारताला भेट दिलेल्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांनीही पाकिस्तानला तालिबानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Taliban attacks Pakistani army after airstrikes; 15 soldiers killed.

Web Summary : Following Pakistani airstrikes on Afghan border areas, the Taliban retaliated, killing 15 Pakistani soldiers in Helmand. Taliban forces seized Pakistani posts, leading to violent clashes in several border provinces. Afghanistan urged Pakistan to respect its sovereignty after the attacks on TTP leaders.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान