पेशावरमध्ये मशिदीवर तालिबानी हल्ला, २० ठार
By Admin | Updated: February 14, 2015 05:51 IST2015-02-14T04:39:03+5:302015-02-14T05:51:44+5:30
वायव्य पाकिस्तानातील अशांत भागात शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमलेले असताना तालिबानच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी कलाश्निकोव्ह रायफलीसह केलेल्या हल्ल्यात

पेशावरमध्ये मशिदीवर तालिबानी हल्ला, २० ठार
पेशावर : वायव्य पाकिस्तानातील अशांत भागात शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमलेले असताना तालिबानच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी कलाश्निकोव्ह रायफलीसह केलेल्या हल्ल्यात २० लोक ठार झाले असून, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला तसेच आत्मघातकी बॉम्बचा स्फोट घडवला असून, अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण असा वांशिक हल्ला आहे.
सिंध प्रांतातील शिया मशिदीवर हल्ला होऊन लहान मुलांसह ६१ जण ठार झालेल्या दुर्घटनेस बरोबर दोन आठवडे उलटले असताना हा हल्ला झाला आहे. देशातील वांशिक हिंसाचाराची ही सर्वात भीषण अशी दुर्घटना आहे. तेहरिक- ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हयाताबाद येथील इमामबरगह इमामिया मशिदीत शुक्रवारी दुपारी लोक नमाजासाठी (झुहूर) जमलेले असताना एकापाठोपाठ तीन स्फोट झाल्याचे तसेच बंदुकीच्या फैरी झाडल्याचेही ऐकू आले.