दहशतवादी शिकवण देणा-या मदशांवर कारवाई करा - नवाझ शरीफ
By Admin | Updated: February 19, 2015 15:50 IST2015-02-19T15:50:53+5:302015-02-19T15:50:53+5:30
पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांसोबत कोणत्या प्रकारचे संभाषण करण्यास इच्छूक नसून दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणा-या केंद्रंवर कारवाई करण्याचे आदेश नवाझ शरीफ यांनी दिले आहेत

दहशतवादी शिकवण देणा-या मदशांवर कारवाई करा - नवाझ शरीफ
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - दहशतवादाचे प्रशिक्षण देणा-या मदरशांवर सक्त कारवाई करायला हवी असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांसोबत कोणत्या प्रकारचे संभाषण करण्यास इच्छूक नसून दहशतवादी व त्यांना प्रशिक्षण देणा-या संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना म्हटले आहे. परंतू अजून कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कारवाई झआली नसल्याचे एका स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे. बुधवारी रावळपिंडी येथे एका शिया मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेवर प्रतिक्रीया देताना शरीफ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यापूर्वी ३० जानेवारी रोजी सिंध प्रांतामध्ये शउक्रवारी नमाजच्या वेळी झालेल्या स्फोटात ६० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस उलटण्याआधीच दुसरस्फोट झाल्याने शरीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे.