तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २ ठार
By Admin | Updated: February 4, 2015 11:04 IST2015-02-04T11:04:08+5:302015-02-04T11:04:15+5:30
ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप येथे नदीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २ ठार
ऑनलाइन लोकमत
ताईपे, दि. ४ - ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप येथे नदीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. एकूण ५८ प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान आज एका पुलाला धडकले आणि नदीत कोसळले. अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मदतीसाठी बचाव कार्य सुरू असून आत्तापर्यंत १० जणांना वाचवण्यात यश मिळाले असले तरी या अपघातात २ जण ठार झाले आहेत.