तैवान भूकंपातील मृतांची संख्या २४

By Admin | Updated: February 8, 2016 03:18 IST2016-02-08T03:18:57+5:302016-02-08T03:18:57+5:30

दक्षिण तैवानला शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यातील मृतांची संख्या आता २४ झाली असून, बचाव कार्य करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आणखी काही जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे.

Taiwan earthquake death toll in 24 | तैवान भूकंपातील मृतांची संख्या २४

तैवान भूकंपातील मृतांची संख्या २४

तायपेई : दक्षिण तैवानला शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यातील मृतांची संख्या आता २४ झाली असून, बचाव कार्य करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आणखी काही जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे.
या भूकंपाची ६.४ एवढी तीव्रता नोंदली गेली होती. भूकंपाची सर्वात जास्त झळ ताइनान या शहराला बसली असून, तेथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १७१ लोकांना जिवंत वाचविण्यात आले आहे. अजून १२४ जण अडकल्याचा अंदाज आहे. ताइनानचे महापौर लाई चिंग म्हणाले की, जिवंत सापडलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Taiwan earthquake death toll in 24