शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:42 IST

26/11 terror attack : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध केला  आहे.

वॉशिंग्टन : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध केला  आहे. ज्या गुन्ह्यासाठी त्याचे  प्रत्यार्पण करण्याचे अपिल  करण्यात आले आहे, त्यात त्याला आधीच मुक्त केले आहे, असा त्याचा दावा आहे.डेव्हिड कोलमन हेडलीचा बालमित्र राणा (वय ५९)याला मुंबई हल्ल्यातील भूमिकेबद्दल प्रत्यार्पित करावे, या भारताच्या मागणीवरून १० जून रोजी लॉस एंजेलिसमधून दुसऱ्यांना गजाआड करण्यात आले. मुंबई हल्ल्यात ६ अमेरिकी नागरिकांसह एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला  होता.मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी हेडली सामील होता. त्याला या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनविण्यात आले आहे. सध्या तो यासाठी अमेरिकेतील जेलमध्ये ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. 

विरोध करणारी याचिका राणाच्या वकिलांनी मागील आठवड्यात लॉस एंजिलिसच्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश जॅकलिन कॅलोनियन यांच्यासमोर प्रत्यार्पणाला विरोध करीत याचिका दाखल केली होती.  राणाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराच्या कलम ६ नुसार राणाला भारतात प्रत्यार्पित करता येऊ शकत नाही. कारण ज्या गुन्ह्यांसाठी  त्याचे प्रत्यार्पण करावे, असे  म्हटले जात आहे, त्यातून त्याला आधीच मुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलम ९ नुसारही त्याला प्रत्यार्पित केले जाऊ शकत नाही. कारण, सरकारने गुन्ह्यांत राणा गुंतला असल्यावर विश्वास ठेवण्यायोग्य कारणे सांगितलेली नाहीत.

टॅग्स :terroristदहशतवादी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारत