शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Russia Vladimir Putin : “युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:57 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. त्यांच्या अचानक दिलेल्या भेटीनंतर सर्वांनाच धक्का बसला.

युक्रेनच्या युद्धाला येत्या २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला सोमवारी अचानक भेट दिली व सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेनच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभी आहे, हे बायडेन यांनी आपल्या युक्रेन दौऱ्यातून रशियाला दाखवून दिले. बायडेन यांच्या भेटीबद्दल विलक्षण गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या लोकांना संबोधित केलं. यावेळी युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ खेळल्याचा आरोप करण्यात आला.

“डोनबासच्या सुरक्षेसाठी रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली. युक्रेनमध्ये सतत हल्ले होत असतानाही डॉनबासचे लोक ठाम होते. रशियानं शांततापूर्ण मार्गाने डॉनबासच्या समस्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. डॉनबासच्या लोकांनी विश्वास ठेवला, त्यांना आशा आहे की रशिया त्यांच्या बचावासाठी येईल. पण पाश्चात्य देशांनी पुन्हा तोच खेळ केला,” असं पुतीन आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले.

विशेष मोहीम सुरू होण्यापूर्वीच, पाश्चात्य देश युक्रेनला हवाई संरक्षण पुरवण्यासाठी चर्चा करत होते. रशियाने वर्षानुवर्षे पाश्चात्य देशांशी संवादाची तयारी दाखवली आहे, मात्र नेहमीच दुर्लक्ष केलं गेल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केलं.

सोमवारी भोंग्यांचा आवाजसोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले. हवाई हल्ला होण्याची शक्यता असेल तर अशा पद्धतीचे भोंगे वाजविले जातात, हे आता तेथील नागरिकांच्या सवयीचे झाले आहे; पण सोमवारी कीव्हमधील सर्व प्रमुख रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. 

युक्रेनला मदतरशियाने एक वर्षापूर्वी आक्रमण केल्यानंतर काही काळ धास्तावलेले कीव्ह आता पुन्हा खंबीरपणे उभे ठाकले आहे. युक्रेन व तेथील लोकशाही ताठ मानेने उभी आहे व आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करत आहे. अमेरिका ही नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहील. युक्रेनला ५० कोटी डॉलरची अतिरिक्त मदत देण्यात येईल, असं बायडेन म्हणाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडनrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन