भारताच्या प्रयत्नांना स्वीडनचा पाठिंबा
By Admin | Updated: June 2, 2015 23:44 IST2015-06-02T23:44:38+5:302015-06-02T23:44:38+5:30
‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम’ (एमटीसीआर) या संघटनेचा प्रमुख सदस्य असलेल्या स्वीडनने संघटनेत प्रवेशाच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला

भारताच्या प्रयत्नांना स्वीडनचा पाठिंबा
स्टॉकहोम : ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम’ (एमटीसीआर) या संघटनेचा प्रमुख सदस्य असलेल्या स्वीडनने संघटनेत प्रवेशाच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. ही संघटना क्षेपणास्त्र आणि मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करते.
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या स्वीडनच्या दौऱ्यावर असून स्वीडनच्या दौऱ्यावर येणारे ते पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत. स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांनी मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसह सोमवारी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान लोफ्वेन यांनी एमटीसीआरमधील भारताच्या प्रवेशास स्वीडनचा पाठिंबा असल्याचे त्यांना सांगितले.
संहारक शस्त्रांचा मारा करू शकणाऱ्या मानवरहित शस्त्रप्रणालीच्या प्रसारबंदीस अनुकूल असलेल्या ३४ देशांची ही खास स्वयंसेवी संघटना आहे.