स्वराज शुक्रवारी श्रीलंका दौ-यावर

By Admin | Updated: March 1, 2015 23:35 IST2015-03-01T23:35:42+5:302015-03-01T23:35:42+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी शुक्रवारी येथे येणार आहेत. गेल्या २५ वर्षांत मोदी हे श्रीलंका

Swaraj visits to Sri Lanka on Friday | स्वराज शुक्रवारी श्रीलंका दौ-यावर

स्वराज शुक्रवारी श्रीलंका दौ-यावर

कोलंबो : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी शुक्रवारी येथे येणार आहेत. गेल्या २५ वर्षांत मोदी हे श्रीलंका दौऱ्यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
दोनदिवसीय दौऱ्यात स्वराज श्रीलंकन पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांची भेट घेणार आहेत. तसेच आपले समपदस्थ मंगला समरवीरा यांच्याशी बातचीत करतील, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष सचिवालयातील सूत्रांनी दिली आहे. परराष्ट्रमंत्री स्वराज या श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ मार्च रोजी श्रीलंका दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची रूपरेषा यादरम्यान निश्चित केली जाईल, असे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Swaraj visits to Sri Lanka on Friday