शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इस्रायलमध्ये आघाडी सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 00:51 IST

राजकीय अस्थिरता संपली : एका वर्षात चौथ्यांदा निवडणुका होण्याची शक्यता मावळली

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असले तरी ते नवीन सरकारची स्थापना करू शकतात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशात आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर इस्रायलच्या संसदेने आघाडी सरकार स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. आता डिसेंबर २०१८ नंतर प्रथमच नवे सरकार देशात स्थापन होणार आहे.

११ न्यायाधीशांच्या पीठाने आघाडी सरकार व नेतन्याहू यांच्या विरोधातील गुन्हेगारी प्रकरणांबाबत शंका व्यक्त केली; परंतु सरकार स्थापन करण्यापासून त्यांना रोखण्यास कोणताही आधार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या आदेशाने देशातील १७ महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली आहे. तसेच एका वर्षात चौथ्यांदा निवडणुका घेण्याची शक्यताही आता मावळली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, नेतन्याहू यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखण्याचे कोणतेही कारण आम्हाला सापडलेले नाही; परंतु यामुळे नेतन्याहू यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य कमी होत नाही. देशात मागील एक वर्षात तीन निवडणुका झाल्या; परंतु कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर नेतन्याहू व माजी लष्करप्रमुख बेनी गँटज यांनी मागील महिन्यात आघाडी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती.

नेतन्याहू यांनी फसवणूक, भ्रष्टाचार व लाचखोरी केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे त्यांना नवे सरकार स्थापन करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणी आज संपली व त्यांचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आपल्याविरोधात निकाल दिला, तर देशाला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, अशी धमकीही नेतन्याहू यांनी कालच दिली होती.सरकार स्थापनेचा ठराव संसदेत मंजूरइस्रायलमध्ये आघाडी सरकार स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी दोन मूळ कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली. बेंजामिन नेतन्याहू यांचा लिकूड पक्ष व त्यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी, माजी लष्करप्रमुख बेनी गँटज यांच्या ब्लू अँड व्हाईट पार्टीमध्ये सत्तेसाठीच्या कराराला ३७ विरुद्ध ७१ मतांनी मंजुरी दिली. यामिनाचे खासदार वगळता इतर सर्व खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला. यामिनाचे खासदार यावेळी अनुपस्थित राहिले. ते आघाडीमध्ये सामील होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ठरावामुळे देशातील चौथ्यांदा होणाºया निवडणुका रोखल्या आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय