पुरस्कार परत करणाऱ्यांना पाठिंबा
By Admin | Updated: October 18, 2015 22:16 IST2015-10-18T22:16:31+5:302015-10-18T22:16:31+5:30
भारतात वाढत असलेल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ ज्या भारतीय लेखक व कलाकारांनी त्यांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार परत केले त्यांच्या पाठीशी सुमारे १५० देशांतील लेखक उभे राहिले आहेत

पुरस्कार परत करणाऱ्यांना पाठिंबा
वॉशिंग्टन : भारतात वाढत असलेल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ ज्या भारतीय लेखक व कलाकारांनी त्यांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार परत केले त्यांच्या पाठीशी सुमारे १५० देशांतील लेखक उभे राहिले आहेत. पेन इंटरनॅशनल ही जगातील लेखकांची आघाडीची संस्था असून, तिने भाजप सरकारने भाषण स्वातंत्र्याचे संरक्षण केले पाहिजे व लेखकांना पुरसे संरक्षण पुरविले पाहिजे, असे आवाहन केले