प्रभाने केली होती दयेची याचना

By Admin | Updated: March 10, 2015 23:39 IST2015-03-10T23:39:42+5:302015-03-10T23:39:42+5:30

सिडनीच्या उपनगरात गेल्या शनिवारी झालेल्या भारतीय महिलेच्या हत्येचा तपास पोलीस गेल्या वर्षीच्या लैंगिक हल्ल्याच्या दिशेनेही करीत आहेत

The supplication of mercy to the Lord | प्रभाने केली होती दयेची याचना

प्रभाने केली होती दयेची याचना

सिडनी : सिडनीच्या उपनगरात गेल्या शनिवारी झालेल्या भारतीय महिलेच्या हत्येचा तपास पोलीस गेल्या वर्षीच्या लैंगिक हल्ल्याच्या दिशेनेही करीत आहेत. दरम्यान, मृत प्रभा अरुण कुमार (४१) यांनी संशयित हल्लेखोर आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून त्याला शेवटच्या क्षणी जिवाची भीक मागितली होती.
प्रभा कुमार यांची वेस्टमिड येथील पार्कमध्ये चाकूने भोसकून हत्या झाली होती. त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्या भारतात असलेल्या आपल्या पतीशी फोनवर बोलत होत्या. या संदर्भात पोलिसांनी सोमवारी त्यांचे पती अरुण कुमार यांच्याकडून माहिती घेतली. प्रभा कुमार यांच्यासोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेने प्रभा कुमार यांनी फोनवरील संभाषणाची माहिती अरुण कुमार यांना ते आॅस्ट्रेलियात आल्यावर दिली.


 

Web Title: The supplication of mercy to the Lord