शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:31 IST

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत.

Sunita Williams Update: गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले NASA चे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनिता आणि बुच लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 19 मार्च 2025 रोजी नासा या दोघांना पृथ्वीवर आणणार आहे. इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स या मिशनमध्ये मदत करत आहे. दरम्यान, अंतराळातून परतण्याबाबत सुनिता यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.

'...ती ठिणगी गमवायची नाही'मीडिया रिपोर्टनुसार, ऑनलाईन पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुनिता विल्यम्सने सांगितले की, पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना सर्वात जास्त कशाची आठवण होईल. त्या म्हणाल्या, "सर्व काही. ही बुच आणि माझा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा तिसरा प्रवास आहे. आम्ही हे तयार करण्यात मदत केली आणि अनेक वर्षांमध्ये यात बदल होताना पाहिला. येथे राहिल्यामुळे एक अनोखा दृष्टीकोन मिळतो. मी पृथ्वीवर परतल्यानंतर नवीन प्रेरणा आणि दृष्टीकोनाची ती ठिणगी गमावू इच्छित नाही."

"आम्ही अंतराळात घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला. आमच्यासाठी हे फक्त एक मिशन होते, पण आमच्या कुटुंबांसाठी आणि समर्थकांसाठी रोलरकोस्टर राईड होती. सर्वात कठीण भाग म्हणजे, आम्ही परत कधी येऊ, हेदेखील आम्हाला माहित नव्हते. आम्ही रोज ठराविक कामे करुन प्रत्येक दिवस मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो," असेही त्या म्हणाल्या.

9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेसुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला केवळ एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे यानाला या दोघांशिवाय पृथ्वीवर परतावे लागले. अनेक प्रयत्न करुनही दोघांना पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले नाही. अखेर इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स नासाच्या मदतीसाठी पुढे आली. या महिन्यातच सुनिता आणि बुच परतणार आहेत. 

टॅग्स :NASAनासाisroइस्रोAmericaअमेरिका