शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कधी आणि कुठे पाहता येणार सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:41 IST

Sunita Williams Return : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतत आहेत.

NASA Sunita Williams Return : मागील 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(ISS) अडकल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या घरवापसीला आता काही तास उरले आहेत. अलीकडेच या दोघांना परत आणण्यासाठी SpaceX चे कॅप्सूल Crew-9 पाठवण्यात आले होते. आता हे यान उद्या(19 मार्च 2025) पहाटेपर्यंत सुनिता आणि बुच यांना घेऊन पृथ्वीवर परतणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून अनडॉक झाले असून, भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.30 वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या यानाच्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, हा परतीचा प्रवास सामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था NASA या परतीच्या प्रवासाची लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवणार आहे.

कुठे आणि कधी पाहता येणार Live स्ट्रीमिंग?नासाने सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर उतरण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित केले आहे. नासा या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याच्या फ्लाइटचे थेट कव्हरेज दाखवणार आहे. याची सुरुवात भारतीय वेळेनुसार मंगळवारी (18 मार्च) सकाळी 8:15 वाजता किंवा ईस्टर्न टाइम झोननुसार सोमवारी (17 मार्च) रात्री 10:45 वाजता सुरू झाली आहे. या प्रवासाचे थेट प्रक्षेपण एजन्सीच्या विनामूल्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म NASA+ (पूर्वी NASA TV) वर दाखवले जाणार आहे. याशिवाय, plus.nasa.gov वर देखील हे विनामूल्य पाहता येईल. 

याव्यतिरिक्त, NASA प्रोग्रामिंग स्पेस एजन्सीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, Facebook, YouTube आणि Twitch वर विनामूल्य पाहता येईल. Roku, Hulu, DirecTV, Dish Network, Google Fiber, Amazon Fire TV आणि Apple TV यांसारख्या थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्म्सवरही याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल, पण त्यासाठी त्या-त्या प्लॅटफॉर्मची फी भरावी लागेल.

यान कुठे उतरणार?नासाच्या माहितीनुसार, हे यान फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात उतरू शकते. नासाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरााच्या हवामान आणि स्प्लॅशडाउन परिस्थितीचे परीक्षण केले आहे. मिशन मॅनेजर या क्षेत्रातील हवामानाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतील. याचे कारण म्हणजे, ड्रॅगन स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये स्पेसक्राफ्टची तयारी, रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थितीसह अनेक घटकांचा समावेश होतो. 

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाisroइस्रो