पाकिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 4 ठार
By Admin | Updated: February 21, 2017 13:39 IST2017-02-21T13:39:15+5:302017-02-21T13:39:15+5:30
पाकिस्तानच्या वायव्येकडील चारसद्दा जिल्ह्यात न्यायालयाजवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 4 ठार
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. 21 - पाकिस्तानच्या वायव्येकडील चारसद्दा जिल्ह्यात न्यायालयाजवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चारसद्दा जिल्ह्यातील तांगी परिसरात असलेल्या न्यायालयाबाहेर दहशतवाद्यांनी गोळीबार करत आत्मघाती बॉम्बस्फोट केला. या बॉम्बस्फोटात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना रुग्णालात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील सेहवान येथील लाल शाहबाज कलंदर मशिदीजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामध्ये 100 हून अधिक जण ठार झाले होते. तसेच, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली होती.
Four killed and 17 injured in multiple explosions in #Charsadda: Pakistan media.
— ANI (@ANI_news) February 21, 2017