मशिदीत आत्मघाती स्फोट, अनेक ठार
By Admin | Updated: October 16, 2015 22:37 IST2015-10-16T22:37:45+5:302015-10-16T22:37:45+5:30
नायजेरियाच्या मैदुगुरी शहरातील एका मशिदीत दोन आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात अनेक भाविक मारले गेले

मशिदीत आत्मघाती स्फोट, अनेक ठार
मैदुगुरी : नायजेरियाच्या मैदुगुरी शहरातील एका मशिदीत दोन आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात अनेक भाविक मारले गेले. बोको हरामचे दहशतवादी मैदुगुरी शहराला सातत्याने लक्ष्य करीत आहेत.
मशिदीतील सर्व लोक मारले गेले. कोणीही वाचलेले नाही, असे मुहतारी अहमदू या व्यापाऱ्याने सांगितले. हल्ला झाला तेव्हा मुहतारी मशिदीजवळच होता. आम्हाला मशिदीत ४२ मृतदेह आढळून आले, असे सतर्कता समितीचे सदस्य अमादु मार्ते यांनी सांगितले. ही समिती बोको हरामविरुद्ध सरकारी सैन्यदलांना साहाय्य करीत आहे. बोर्नो राज्याच्या पोलिसांनी दुहेरी स्फोटाला दुजोरा दिला; मात्र मृतांची संख्या केवळ १४ असल्याचे सांगितले.
स्फोटानंतर मशीद कोसळली आणि नमाज अदा करत असलेले अनेक लोक जखमी झाले. जखमींना मैदुगिरी विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे स्थानिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
(वृत्तसंस्था)