सिरियात आत्मघाती बॉम्बस्फोट, 25 ठार

By Admin | Updated: March 15, 2017 20:04 IST2017-03-15T19:35:16+5:302017-03-15T20:04:33+5:30

सिरियामधील दमस्‍कुस येथील न्यायालयाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहेत.

Suicide bomb blast in Syria, 25 dead | सिरियात आत्मघाती बॉम्बस्फोट, 25 ठार

सिरियात आत्मघाती बॉम्बस्फोट, 25 ठार

>ऑनलाइन लोकमत
बैरुत, दि. 15 -  सिरियामधील दमस्‍कुस येथील न्यायालयाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहेत. 
येथील स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दमस्‍कुस येथील न्यायालयाजवळ बुधवारी हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. हा बॉम्बस्फोट न्यायालयात करण्याच्या उद्देशाने हल्लेखोर आला असता त्याला न्यायालयाच्या गेटसमोर पोलिसांनी अटकाव केला. यावेळी त्याने गेटसमोरच आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात आत्तापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून अनेक जण जखमी झाले आहेत. 
दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. 

Web Title: Suicide bomb blast in Syria, 25 dead