काबूलमध्ये आत्मघाती हल्ला, १० ठार
By Admin | Updated: February 1, 2016 16:42 IST2016-02-01T16:42:48+5:302016-02-01T16:42:48+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

काबूलमध्ये आत्मघाती हल्ला, १० ठार
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि.१ - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
काबूलमधील अफगाणिस्तानच्या संसदेजवळ असलेल्या देह मझांग परिसरात हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या वृत्ताला अफगाणिस्तानचे गृहमंत्री आयुब सलांगी यांनी दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून चौकशी सुरु आहे. जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच, या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याचे समजते.