बगदादमध्ये आत्मघाती हल्ला, २६ ठार
By Admin | Updated: July 8, 2016 05:37 IST2016-07-08T04:57:26+5:302016-07-08T05:37:47+5:30
येथील उत्तरेकडील भागात असलेल्या एका मशिदीजवळ अनेक आत्मघाती हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

बगदादमध्ये आत्मघाती हल्ला, २६ ठार
>ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि.८ - येथील उत्तरेकडील भागात असलेल्या एका मशिदीजवळ अनेक आत्मघाती हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इराकच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी बगदाद शहरापासून ५० मैल लांब असलेल्या उत्तरेकडील बालादमधील एका मशिदीजवळ गुरुवारी (दि.७) रात्री हा हल्ला करण्यात आला. रमजान ईद साजरी करण्यासाठी या ठिकानी अनेक जण उपस्थित होते. यावेळी हल्लेखोरांनी मशिदीच्या सुरक्षा रक्षकांसह अनेकांवर गोळीबार केला. यामध्ये २६ जण ठार झाले असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी तीन हल्लेखोरांचा खात्मा केल्याचे समजते. या हल्लातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप स्वीकारली नाही आहे.