- निनाद देशमुख - बेंगळूरू : एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती. या दुर्घटनेत विंग कमांडर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने शनिवारी झालेल्या एअर शो मध्ये सहभागी होत पुन्हा आकाशात भरारी घेतली. यावेळी साहिल याच्या विमानाची जागा रिकामी ठेवत त्यांना मानवंदना देण्यात आली.बेंगळूरू येथील एलहांका विमानतरळावर एअरो इंडिया २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चाणा-या या प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी सूर्यकिरण एरोबॅटीक टीम सराव करत होती. सरावा दरम्यान मिरर फोरर्मेशन करताना दोन विमाने एकमेकाना धडकल्याने ती कोसळली. यावेळी विंग कमांडर साहिल गांधी यांना वेळीच विमाना बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या विमानातील विंग कमांडर विजय शेळके आणि विंग कमांडर तेजस्वर सिंग हे पॅराशुटच्या साह्याने बाहेर पडले असले तरी ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे उद्घाटन सोहळ्यादरम्यान होणारी सूर्यकिरण विमानांची प्रात्यक्षिके रद्द करण्यात आली होती. तसेच या पुढे या विमानाचे उड्डाण होणार की नाही याबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एअर शो मध्ये सूर्यकिरण विमानांनी सहभाग घेत पुन्हा उड्डाण केले. यावेळी मोजक्याच कवायती या पथकाने सादर केल्या. डायमंड फॉर्मेशन सादर करत यातील साहिल गांधी यांच्या विमानाची जागा रिकामी ठेवत साहिल याना आदरांजली वाहण्यात आली. या पथकात ९ विमानांचा समावेश असायचा मात्र अपघातात दोन विमाने नष्ट झाल्यामुळे ७ विमानाच्या पथकाने ही प्रात्यक्षिके सादर केली.
..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:03 IST
एअरो इंडिया २०१९ च्या उद्घाटन समारंभासाठी सराव करत असताना सूर्यकिरण विमानाची धडक झाल्याने दोन विमाने कोसळली होती.
..... आणि दुर्दम्य इच्छा शक्तीचे पंख लावून सूर्यकिरण विमाने पुन्हा झेपावली आकाशाकडे...
ठळक मुद्देएअर शोमध्ये सहभाग : विंग कमांडर साहिल गांधी यांना वाहिली आदरांजली डायमंड फॉर्मेशन सादर करताना साहिल गांधी यांच्या विमानाची जागा रिकामी ठेवत त्यांना आदरांजली