फ्लार्इंग सॉसरची यशस्वी चाचणी
By Admin | Updated: June 9, 2015 23:52 IST2015-06-09T23:52:18+5:302015-06-09T23:52:18+5:30
हवामानामुळे अनेक वेळा लांबणीवर पडलेली नासाच्या फ्लार्इंग सॉसरची चाचणी यशस्वी झाली आहे.

फ्लार्इंग सॉसरची यशस्वी चाचणी
वॉशिंग्टन : हवामानामुळे अनेक वेळा लांबणीवर पडलेली नासाच्या फ्लार्इंग सॉसरची चाचणी यशस्वी झाली असून, यामुळे सुदूर अंतरावरील ग्रहांच्या पृष्ठभागावर अधिक वजनाच्या वस्तू पाठविणे शक्य होणार आहे. मंगळावरही जड वस्तू पाठविणे यामुळे शक्य होणार आहे. मंगळावर माणूस पाठविताना हे तंत्रज्ञान उपयोगात येणार आहे.
या चाचणीद्वारे बलूनच्या साहाय्याने फ्लार्इंग सॉसर १ लाख २० हजार फुटापर्यंत नेण्यात आली. सॉसर १ लाख ८० हजार फुटापर्यंत गेल्यानंतर व तिथे मंगळासारखे विरळ हवामान तयार करण्यात आले, असे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. १ लाख ८० हजार फुटापर्यंत गेल्यानंतर बशीच्या आकारातील एअरबॅग यशस्वीपणे फुलली; पण त्याबरोबर असलेले मोठे पॅराशूट अर्धवट फुलल्यामुळे नासाच्या अभियंत्यांनी त्याला पार्शल शूट असे म्हटले आहे.
फ्लार्इंग सॉसरच्या एकूण तीन चाचण्या असून त्यापैकी ही दुसरी चाचणी होती. गेल्या वर्षी हवाई येथील चाचणीत पॅराशूट फुललेच नव्हते. (वृत्तसंस्था)