अतरंगी सेक्स जीवावर बेतला !

By Admin | Updated: August 25, 2015 06:43 IST2015-08-25T06:43:26+5:302015-08-25T06:43:26+5:30

लंडनमधील एका किल्ल्याच्या तटबंदीजवळ रोमान्स करणे एका प्रेमी युगूलाच्या जीवावर बेतले. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या प्रेमी युगूलाचा ४० फूट खोल दरीत

Strong sex life is dead! | अतरंगी सेक्स जीवावर बेतला !

अतरंगी सेक्स जीवावर बेतला !

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. २५ -  लंडनमधील एका किल्ल्याच्या तटबंदीजवळ रोमान्स करणे एका प्रेमी युगूलाच्या जीवावर बेतले. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना तोल गेल्याने  या युगूलाचा ४० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. 
लंडनजवळ व्हॅबन येथे ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्यालगतच्या खोल दरीत एक प्रेमी युगूल मृतावस्थेत आढळले. यावेळी हे युगूल विवस्त्र अवस्थेत होते. दरम्यान याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांचे कपडे किल्ल्यावरील तटबंदीवर सापडले असून किल्ल्यातील एकांताचा फायदा घेत दोघेही सेक्स करत होते आणि त्या नादात त्यांचा तोल जाऊन दोघेही खोल दरीत कोसळले असतील, असा पोलिसांचा अंदाज वर्तविला आहे. याचबरोबर हे दोघेही मुळचे फ्रान्सचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत असून त्यांचे वय ३० वर्ष असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.  
 

 

Web Title: Strong sex life is dead!