सेक्स करून मुलींना पवित्र करण्याची विचित्र प्रथा
By Admin | Updated: July 26, 2016 21:36 IST2016-07-26T21:36:36+5:302016-07-26T21:36:36+5:30
द. आफ्रिकेतील मलावी या देशात शुद्धीकरणाच्या नावाखाली मुलींवर चक्क बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

सेक्स करून मुलींना पवित्र करण्याची विचित्र प्रथा
ऑनलाइन लोकमत
दर्बन, दि. 26 - द. आफ्रिकेतील मलावी या देशात शुद्धीकरणाच्या नावाखाली मुलींवर चक्क बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दक्षिण आफिक्रेतल्या मलावी या देशातल्या सुदूर भागात आजही प्रथा अव्याहतपणे सुरू आहे. इथं शुद्धीकरणाच्या नावाखाली धर्मोपदेशकच मुलींसोबत शरीर संबंध ठेवतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकाराला या मुलींच्या जन्मदात्या आईचीही मुख संमती असते. बलात्कार करणा-या व्यक्तीला हायना असे संबोधले जाते. या देशातले सेक्स वर्करचे काम करणारी करणारी काही पुरुष मंडळीच धर्मोपदेश म्हणून काम पाहतात.
या विचित्र प्रथेच्या आड इथं सेक्स वर्कर म्हणजेच कथित धर्मोपदेशक मुलींसोबत सेक्स करून त्यांचं आयुष्य नासवतात. हायनाच्या नावाखाली होणा-या बलात्काराला येथे शुद्धीकरणाच्या नावाखाली झाकलं जातं आहे. मात्र या प्रथेमुळे आतापर्यंत हजारो वयात आलेल्या मुलीची या कथित धर्मोपदेशकांनी आयुष्य नासवली आहेत.