अमेरिकी शहरात वादळ; एकाचा मृत्यू, १६ जखमी
By Admin | Updated: June 18, 2014 05:30 IST2014-06-18T05:30:34+5:302014-06-18T05:30:34+5:30
नेब्रास्काच्या ईशान्य भागात आलेल्या भीषण चक्रीवादळात एक व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर १६ जण गंभीर जखमी झाले.

अमेरिकी शहरात वादळ; एकाचा मृत्यू, १६ जखमी
प्लिजर : नेब्रास्काच्या ईशान्य भागात आलेल्या भीषण चक्रीवादळात एक व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर १६ जण गंभीर जखमी झाले. वादळामुळे प्लिजर शहराचा निम्मा भाग नामशेष झाला आहे. या शहराला सोमवारी वादळाचा दोनदा तडाखा बसला. यात अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या, असे राष्ट्रीय हवामान सेवेने सांगितले. स्थानिक रहिवासी आणि आपत्ती सेवा कर्मचाऱ्यांनी रात्रभर ढिगारे उपसले.