शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:18 IST

Steve Jobs : स्टीव्ह जॉब्स 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात. 

आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. तसेच, अॅपलचे (Apple) संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या वस्तूंचा लिलाव होत आहे. लिलावात होणाऱ्या वस्तूंची बोली खूप जास्त लावली जात आहे. पण, त्यांच्या Birkenstocks सँडलसाठी आश्चर्यकारक बोली लावण्यात आली आहे. या सँडलची खास गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये अॅपलची स्थापना केली, त्या गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स हे सँडल घालत होते.

स्टीव्ह जॉब्स यांच्या या Birkenstocks सँडलसाठी 218,700 डॉलरची (जवळपास 1.77 कोटी रुपये)  बोली लावण्यात आली. तपकिरी रंगाच्या या सँडलच्या बोलीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लिलावापूर्वी अंदाज वर्तवला जात होता की, स्टीव्ह जॉब्स यांच्या या सँडल सुमारे 80 हजार डॉलर्समध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. त्यांच्या या सँडल्स खूप लोकप्रिय होत्या. स्टीव्ह जॉब्स हे 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात. 

सँडलसाठी बोली लावणाऱ्या ज्युलियनच्या लिलावानुसार स्टीव्ह जॉब्स यांनी या सँडल आपल्या घराच्या व्यवस्थापकाला दिल्या होत्या. पण, या सँडल्सची लिलावात लिस्ट कोणी केली, हे आता स्पष्ट झालेले नाही. मात्र, कंपनीने खरेदीदाराबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. Birkenstocks बद्दलच्या चर्चेवेळी स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी Crisann Brennan हिने एका मुलाखतीत सांगितले की, हे सँडल स्टीव्ह जॉब्स यांच्या सिंपल साइडचा भाग होते. हे त्यांचे युनिफॉर्म होते.

दरम्यान, अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या विचारांना, त्यांच्या आयुष्याला अनेक जण फॉलो करतात. 2011 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले. त्यांच्यामुळेच  आयफोन हा मोबाईलमधील अग्रगण्य ब्रॅंड झाला. त्यांच्यासारखी बिझिनेस स्ट्रॅटेजी हवी म्हणून अनेक जण प्रयत्न करतात. स्टीव्ह जॉब्स इतके श्रीमंत असून अगदी साधे राहायचे. त्यांचा हाच अंदाज सर्वांना आवडायचा.

Apple-1 Prototype ची सुद्धा करोडोत लागली होती बोलीनुकतीच Apple-1 Prototype ची विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. बोली लावताना त्याची किंमत करोडोंच्या घरात गेली. Apple-1 Prototype ची बोली इतकी जास्त असण्यामागे एक खास कारण आहे. त्याचा वापर स्टीव्ह जॉब्सने केला होता. रिपोर्टनुसार, Apple-1 Prototype जवळपास 677,196 डॉलरमध्ये (सुमारे 5.5 कोटी रुपये) विकला गेला आहे. या प्रोटोटाइपचा वापर स्टीव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथील बाईट शॉपचे मालक पॉल टेरेल यांना कॅम्प्युटरची खासियत दाखवण्यासाठी केला होता. हे जगातील पहिल्या पर्सनल कॅम्प्युटर स्टोअरपैकी एक होते. मात्र, त्याच्या खरेदीदाराची माहिती देण्यात आली नाही.

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्सApple Incअॅपलbusinessव्यवसाय