सडपातळ राहण्यासाठी दररोज केवळ तीन चमचे भात

By Admin | Updated: April 28, 2017 01:56 IST2017-04-28T01:55:06+5:302017-04-28T01:56:35+5:30

हल्ली प्रत्येक जण स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी काही ना काही करतो. कोणी दररोज जीममध्ये घाम गाळतो, तर कोणी योगासने करतो.

To stay slim, only three spoons of rice per day | सडपातळ राहण्यासाठी दररोज केवळ तीन चमचे भात

सडपातळ राहण्यासाठी दररोज केवळ तीन चमचे भात

सेऊल : हल्ली प्रत्येक जण स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी काही ना काही करतो. कोणी दररोज जीममध्ये घाम गाळतो, तर कोणी योगासने करतो. काही जण डाएटिंग करतात. मात्र, काहींचे डाएटिंग एवढे अचाट असते की, विश्वासच बसू शकणार नाही. दक्षिण कोरियन अभिनेत्री ली ते इम हिचे उदाहरण घ्या ना. ती ‘स्लीमट्रीम’ होण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज केवळ तीन चमचे भात खात आहे. ली सध्या आपल्या आहारावरून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ली खूप सडपातळ दिसली. तिच्या घटलेल्या वजनाचे अनेकांना कुतूहल वाटले. उपस्थितांनी याबाबत विचारले. तेव्हा लीने ती गेल्या सहा महिन्यांपासून दररोज केवळ तीन चमचे भात असल्याचे सांगितले. ‘सहा महिन्यांपूर्वी एका फोटोशूटदरम्यान आपण जाड होत असल्याचे मला जाणवले. तेव्हापासून मी नेहमीचे जेवण सोडले आणि दररोज केवळ तीन छोटे चमचे भात खाऊ लागले’, असे ती म्हणाली. तिच्या सौंदर्याचे रहस्य तीन चमचे भात असल्याचे तिने सांगितले. मात्र, त्याचबरोबर मी नैसर्गिक गोष्टी अधिक प्रमाणात सेवन करीत असल्यामुळे माझे सौंदर्य अबाधित असल्याचेही तिने सांगितले.

Web Title: To stay slim, only three spoons of rice per day