शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

उपाशी, रिकामा होत चाललेला देश आणि बॅले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 10:38 IST

वाल्देस मुळात या कंपनीची डायरेक्टर झाली तीच खडतर परिस्थितीत. तिच्या आधी क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची डायरेक्टर होती ती क्युबाची सगळ्यात मोठी स्टार बॅलेरिना अलिशिया अलोन्सो.

विंगसे वाल्देस ही क्युबाची सुप्रसिद्ध बॅलेरिना येत्या २ नोव्हेंबरला क्युबाच्या नॅशनल थिएटरमध्ये तिची कला सादर करणार आहे. तिने २५ वर्षांपूर्वी गिझेल नावाचं पात्र पहिल्यांदा सादर केलं होतं. २ नोव्हेंबर रोजी ती पुन्हा एकदा तेच पात्र सादर करणार आहे. मात्र यावेळी हे सादरीकरण ती हवानाच्या सगळ्यात प्रसिद्ध अशा ग्रॅन टिएट्रो डे ला हवाना अलिशिया अलोन्सो नावाच्या सभागृहात सादर करू शकणार नाही. कारण आजघडीला या प्रसिद्ध सभागृहाला मोठ्या प्रमाणात वाळवी लागलेली आहे. त्याऐवजी ती ज्या नॅशनल थिएटरमध्ये तिचा प्रयोग करणार आहे तो रंगमंचदेखील तिच्या सादरीकरणाच्या वेळी कोलमडणार नाही अशी तिला आशा आहे.

४४ वर्षांच्या वाल्देसने नुकतीच क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची सूत्र डायरेक्टर म्हणून हाती घेतली आहेत. थिएटरच्या आत्ताच्या अवस्थेबद्दल ती म्हणते, "या थिएटरची अशी अवस्था असणं हे फारच वेदनादायक आहे. कारण ते थिएटर हे क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीचं घर असल्यासारखं आहे. आणि खरं तर माझी इच्छा तिथे आंतरराष्ट्रीय बॅले महोत्सव भरवण्याची आहे. पण आज परिस्थिती अशी आहे, की गेली दीड वर्षं तर तिथे दुरुस्ती कामच सुरु आहे."

वाल्देस मुळात या कंपनीची डायरेक्टर झाली तीच खडतर परिस्थितीत. तिच्या आधी क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची डायरेक्टर होती ती क्युबाची सगळ्यात मोठी स्टार बॅलेरिना अलिशिया अलोन्सो. अलिशिया अलोन्सोला खुद्द फिडेल कॅस्ट्रो यांनी विनंती करून क्युबाला परत बोलावून घेतलं होतं. 

कॅस्ट्रो यांची अशी इच्छा होती, की अलोन्सोने क्युबाची स्वतःची उत्तम बॅले कंपनी उभी करावी. त्या बॅले कंपनीने असं काम करावं की क्युबाच्या प्रत्येक नागरिकाला तिचा अभिमान वाटेल. आणि अलोन्सोने अक्षरशः जिवाचं रान करून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. तिच्या सुवर्णकाळात ती क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो इतकीच लोकप्रिय होती. मात्र नंतर नंतर तिचे प्रयोग हे स्वतःभोवती आरत्या ओवाळणारे ठरू लागले. त्यातून अनेक उत्तर बॅले कलाकार या कंपनीला सोडून गेले. मात्र अशा परिस्थितीतही वाल्देस अलोन्सोबरोबर राहिली. ती म्हणते, की मी ३० वर्षांच्या काळात अलोन्सोकडून खूप काही शिकले. माझं स्वतःचं बॅलेरिना म्हणून आंतरराष्ट्रीय करिअर होतं. मी जपानपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंत अनेक ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे. त्यानंतर आपल्या देशात परत येऊन नृत्य सादर करण्यातला आनंद काही वेगळाच असायचा."

अलिशिया अलोन्सोचं ऑक्टोबर २०१९ मध्ये वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यानंतर तिची उत्तराधिकारी म्हणून वाल्देसच्या खांद्यावर क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची धुरा आली. डायरेक्टर झाल्यानंतर वाल्देसच्या समोर एकापाठोपाठ एक संकटांची मालिकाच उभी राहिली. सगळ्यात आधी तर २०२० साली कोरोनाच्या काळातल्या लॉकडाऊनचा बॅलेला फटका बसला. आता वीजकपातीचं संकट तिच्यासमोर आ वासून उभं आहे. क्युबामध्ये असलेला अन्नधान्याचा तुटवडा, कोलमडणारी आहेत. थिएटर्स आणि मोठ्या प्रमाणात देश सोडून जाणारे क्युबन तरुण लोक या सगळ्याला तोंड देत क्युबामध्ये बॅले कंपनी पुन्हा उभी करायचं आव्हान वाल्देससमोर आहे ती म्हणते, की "या सगळ्या अडचणी कमी होत्या म्हणून की काय, पण ही सगळी तयारी चालू असताना मी एका बाळाला जन्म दिला."

अर्थात अलोन्सो जरी क्युबाची आद्य बॅलेरिना असली, तरी तिची कारकीर्द काही वादातीत नव्हती. तिच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले होते. विशेषतः कृष्णवर्णीय बॅले नर्तक- नर्तिकांना तिने कायम उपेक्षित ठेवलं असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामानाने वाल्देसने तिच्या वाट्याला आलेली परिस्थिती अधिक चांगली हाताळली आहे. आजघडीला तिच्याबरोबर ७० नृत्यांगणांचा ताफा आहे. इतकंच नाही, तर त्यापैकी वीस नर्तक तिने कोरोनाच्या कठीण काळात कंपनीशी जोडून घेतलेले आहेत.वाल्देस तिच्या बाजूने जमेल तेवढे प्रयत्न करते आहे, मात्र आपल्या पुढ्यात नक्की काय वाढून ठेवलेले आहे हे तिला माहीत नाही. तरुण लोक देश सोडून जात असताना तुला या बॅलेची काय काळजी, असं तिला विचारणारे लोकही आहेतच!

नक्की काय होणार?या वर्षात सुमारे दोन लाख क्युबन्स देश सोडून गेले आहेत. त्यात बॅले कंपनीच्या जवळजवळ २० नर्तक आणि नर्तिकांचा समावेश आहे. असे एकामागून येणारे एकेक धक्के नॅशनल बॅले कंपनी पचवू शकेल का? आणि वाल्देस कंपनीला तिचा सुवर्णकाळ पुन्हा मिळवून देऊ शकेल का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत, हे खरेच!

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय