स्टार वॉर्स अभिनेत्री कॅरी फिशर यांचं निधन

By Admin | Updated: December 28, 2016 02:49 IST2016-12-28T00:53:08+5:302016-12-28T02:49:59+5:30

हॉलिवूडमधील स्टार वॉर्स अभिनेत्री कॅरी फिशर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या.

Star Wars actress Carrie Fisher dies | स्टार वॉर्स अभिनेत्री कॅरी फिशर यांचं निधन

स्टार वॉर्स अभिनेत्री कॅरी फिशर यांचं निधन

>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 28 - हॉलिवूडमधील स्टार वॉर्स अभिनेत्री कॅरी फिशर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी लंडनहून लॉस एंजेलिसला येताना अभिनेत्री कॅरी फिशर यांना विमानात हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी येथील स्थानिक वेळेनुसार नऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, कॅरी फिशर यांची मुलगी बिली लॉर्ड हिने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
कॅरी फिशर यांनी साकारलेली स्टार वार्स या सिनेमातील प्रिसेंस लिया ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. 

Web Title: Star Wars actress Carrie Fisher dies