शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:36 IST

America Lay Offs: अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारी विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कपातीची मोहीम तीव्र होत चालली असून ‘यूएसएड’पाठोपाठ आता हवामान खाते आणि सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही बालंट आले आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या बडतर्फीमुळे नवा वाद पेटला आहे.

संरक्षण दलातही हादराट्रम्प यांनी ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला असून, अमेरिकेच्या पाच माजी संरक्षणमंत्र्यांनी या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बडतर्फीवर अमेरिकी काँग्रेसने तातडिने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी नौदलप्रमुख ॲड. लिसा फ्रेंचेटी, हवाईदलाचे उपप्रमुख जन. जिम स्लाईफ, तसेच लष्करी सेवेत नियुक्त न्यायाधीशांना पदावरून हटवले होते. तत्पूर्वी ट्रम्प यांनी हवाई दलाचे प्रमुख जनरल सी. क्यू. ब्राऊन यांना प्रमुखपदावरून काढून टाकले होते. अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे. (वृत्तसंस्था)

लाभार्थींवर होणार थेट परिणामसामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ घेणाऱ्या सुमारे ७२.५ दशलक्ष लाभार्थींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. या योजनांचे लाभ दिले जात असताना ही सेवा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देणे शक्य नसल्याचे काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांच्याही गेल्या नोकऱ्याट्रम्प प्रशासनाने हवामानतज्ज्ञांसह या विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. महासागर व हवामानविषयक प्रशासनातील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांनाही आता काढून टाकण्यात आले आहे. हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ शास्त्रज्ञही यातून सुटलेले नाहीत.

भरल्या डोळ्यांनी घेतला निरोप‘यूएसएड’अर्थात युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या बंद करण्यात आलेल्या संस्थेच्या मुख्यालयातून शुक्रवारी शेकडो कर्मचाऱ्यांनी भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला. अमेरिकी काँग्रेसच्या मंजुरीनंतर ही घटनात्मक संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले ९० टक्के करार आता रद्द करण्यात आले आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाला धक्केअमेरिकेतील सामाजिक सुरक्षा विभागांतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी ७,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, ही कपात ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. इलॉन मस्क यांच्या आखत्यारितील सरकारी दक्षता विभागाच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जात आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका