शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

Sri lanka crisis: श्रीलंका आर्थिक संकटात, विश्वचषक विजेता खेळाडू पेट्रोल पंपावर वाटतोय चहा-पाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 11:11 IST

Sri lanka crisis: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेचा माजी विश्वचषक विजेता खेळाडू आपल्या देशवासियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

Sri Lanka Crisis: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत. यातच श्रीलंकेचा विश्वचषक विजेता खेळाडू रोशन महानामा आपल्या देशवासियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तो करतोय. 

पेट्रोल पंपावर चहाचे वाटपविशेष म्हणजे, श्रीलंकेचा हा माजी क्रिकेटपटू आपल्या देशातील लोकांना चहा वाटतोय. या क्रिकेटपटूने स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. महानमाने ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठाभोवती पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जेवण दिले. या रांगा दिवसेंदिवस लांबत चालल्या आहेत. रांगेतील लोकांचे आरोग्य बिघडत आहे. प्रत्येकाने काळजी घ्या. एकमेकांना मदत करा.' श्रीलंकन ​​क्रिकेटपटूच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीलंकेचे इंधन संपणारअत्यावश्यक इंधन आयातीसाठी देश परकीय चलनासाठी संघर्ष करत आहे. तसेच, श्रीलंकेतील सध्याचा पेट्रोल आणि डिझेलचा साठाही काही दिवसांत संपणार आहे. यामुळेच श्रीलंकन नागरिक लाबंच लांब रागां करत इंधन भरुन घेत आहेत. 

रोशनची कारकीर्दरोशन महानमा यांने श्रीलंकेसाठी 52 कसोटी आणि 213 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 4 शतके आणि 11 अर्धशतके झळकावत एकूण 2576 धावा केल्या आहेत. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 35 अर्धशतकांच्या मदतीने 5162 धावा केल्या. 1996 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचाही तो भाग होता. 1996 च्या विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. 1999 च्या विश्वचषकानंतर महानमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाcricket off the fieldऑफ द फिल्ड