पोपकडून श्रीलंकेतील भारतीयाला संतपद
By Admin | Updated: January 15, 2015 06:17 IST2015-01-15T06:17:45+5:302015-01-15T06:17:45+5:30
श्रीलंकेतील मूळ भारतीय कॅथॉलिक मिशनरी जोसेफ वाझ यांना पोप फ्रान्सिस यांनी आज संतपद जाहीर केले असून, श्रीलंकेतील नागरी युद्धानंतर, १७ व्या शतकातील हे धर्मगुरू राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आहेत,

पोपकडून श्रीलंकेतील भारतीयाला संतपद
कोलंबो : श्रीलंकेतील मूळ भारतीय कॅथॉलिक मिशनरी जोसेफ वाझ यांना पोप फ्रान्सिस यांनी आज संतपद जाहीर केले असून, श्रीलंकेतील नागरी युद्धानंतर, १७ व्या शतकातील हे धर्मगुरू राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आहेत, असा गौरव केला आहे. कोलंबो येथील सागरी किनारी झालेल्या या सोहळ्यास हजारो लोक उपस्थित होते. जोसेफ वाझ यांना संतपद मिळाल्याची घोषणा होताच हजारो लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गाले समुद्र किनारी घेतलेल्या मोठ्या प्रार्थनेच्या आरंभी पोप फ्रान्सिस यांनी वाझ यांना संतपद दिल्याची घोषणा केली.
जोसेफ वाझ यांचा जन्म तत्कालीन पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्यात १६५१ साली झाला होता. वाझ हे १६८७ साली ख्रिश्चन भाविकांना एकत्र आणण्यासाठी श्रीलंकेत गेले. पोर्तुगीजांकडून डच वसाहतवाद्यांनी तोपर्यंत श्रीलंकेची किनारपट्टी ताब्यात घेतली होती व कॅथॉलिक भाविकांवर अत्याचार केले जात होते. वाझ यांनी खेड्यातून खेड्यात प्रवास करीत कॅथॉलिक भाविकांना एकत्र केले. १७११ साली त्यांचे निधन झाले, तोपर्यंत त्यांनी ख्रिश्चन बांधवांना एकत्र आणून कॅथालिक चर्चही बांधले होते. (वृत्तसंस्था)