श्रीलंकन क्रिकेटपटू नुआन कुलसेकराला अटक आणि सुटका
By Admin | Updated: September 20, 2016 13:58 IST2016-09-20T13:58:22+5:302016-09-20T13:58:22+5:30
रस्ते अपघाता प्रकरणी अटक करण्यात आलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुआन कुलसेकराची जामिनावर सुटका झाली आहे.

श्रीलंकन क्रिकेटपटू नुआन कुलसेकराला अटक आणि सुटका
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २० - रस्ते अपघाता प्रकरणी अटक करण्यात आलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुआन कुलसेकराची जामिनावर सुटका झाली आहे. सोमवारी कुलसेकराच्या गाडीची एका दुचाकीबरोबर धडक झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कुलसेकराला अटक झाली होती. बसला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व तो माझ्या मार्गात आला असे कुलसेकराने सांगितले. मार्च महिन्यात भारतात झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कुलसेकरा शेवटचा सामना खेळला होता.
त्यानंतर ३४ वर्षीय कुलसेकराचा इंग्लंड दौरा आणि मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. २१ कसोटी सामने खेळणा-या कुलसेकराने जून महिन्यात कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. वनडे आणि टी-२० क्रिकेट अधिककाळ खेळता यावे म्हणून कुलसेकराने कसोटीमधून निवृत्ती स्वीकारली.