शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं 2 जणांचा मृत्यू, तर पेपरअभावी परीक्षा रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 21:05 IST

सध्या श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत असून, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही.

सध्या श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत असून, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. श्रीलंकेतील लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

श्रीलंकेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे हैराण झालेले लोक इंधन खरेदी करून त्याचा साठा करत आहेत. दरम्यान, रविवारी श्रीलंकेतील दोन वेगवेगळ्या भागात इंधन घेण्यासाठी रांगेत तासनतास प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असून त्यांचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक होतं, असं कोलंबोतील पोलिस प्रवक्ते नलिन थलदुवा यांनी सांगितलं. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल आणि रॉकेल घेण्यासाठी रांगेत उभे होते. यादरम्यान ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

श्रीलंकेत अनेक तास वीज खंडित होत आहे. त्यामुळे लोक पंपांवर तासनतास रांगा लावून इंधन घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या पहिल्या व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं आणि तो दुचाकी चालक होता, जो मधुमेह आणि हृदय विकाराचा रुग्ण होता. तर दुसरा व्यक्ती 72 वर्षांचा होता. दोघेही जवळपास ४ तास इंधनासाठी रांगेत उभे होते. ''देशातील कच्च्या तेलाचा साठा रविवारी संपल्यानंतर एकमेव इंधन रिफायनरी देखील बंद करण्यात आली आहे", असं पेट्रोलियम जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अशोक रानवाला म्हणाले. 

एलपीजीच्या किमतीत वाढएलपीजीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर केरोसीन हा अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा एकमेव आधार बनला आहे आणि त्यामुळे रॉकेलची मागणी वाढली आहे. श्रीलंकेतील एलपीजीचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार Laugfs Gasने एका निवेदनात म्हटले आहे की 12.5 किलो सिलेंडरची किंमत $ 4.94 (रु. 1,359) ने वाढवली आहे. श्रीलंकेला जानेवारीपासून इंधन शिपमेंट पेमेंट संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील परकीय चलनाचा साठा फेब्रुवारीमध्ये 2.31 अब्ज डॉलरवर घसरला आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेची चलनवाढ 15.1 टक्क्यांवर पोहोचली, जी आशिया खंडातील सर्वोच्च आहे. त्याच वेळी अन्नधान्य महागाई 25.7 टक्क्यांवर पोहोचली.

महागाईमुळे, 400 ग्रॅम दुधाच्या पावडरच्या किमतीत शनिवारी 250 रुपयांनी ($ 0.90) वाढ झाली, ज्यामुळे रेस्टॉरंट मालकांना दुधाच्या चहाच्या एका कपच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत वाढ करावी लागली आहे. 

पेपर न मिळाल्याने परीक्षा रद्दएवढेच नाही तर देशात कागद खरेदी करण्यासाठी डॉलर नाही. पेपर खरेदी करता न आल्याने देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून कागद खरेदी करण्यासाठी देशाकडे डॉलर नाहीत. दरम्यान, श्रीलंकन ​​सरकारने जाहीर केले की ते IMF कडून आपल्या बिघडलेल्या विदेशी कर्जाच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी आणि परकीय चलन साठा वाढवण्यासाठी बेल-आउट पॅकेज मागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInflationमहागाई