शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर श्रीलंका! चीन-जपानच्या अब्जावधी डॉलर्सचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:47 IST

आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे.

श्रीलंकेतील आर्थिक संकट (Sri Lanka Economic Crisis) सातत्याने वाढताना दिसत आहे. आता तर, आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे. कारण, इंटरनॅशनल मॉनेटरी फंडकडून (IMF) श्रीलंकेला बेलआउट पॅकेज मिळू शकलेले नाही. श्रीलंकेचे ट्रेझरी सेक्रेटरी महिंद्रा सिरीवर्दने यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

यासंदर्भात, श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयाने कर्ज दिलेल्या देशांच्या सरकारांना आणि इतर कर्जदारांना, मंगळवारनंतर जे व्याज देय आहे, त्यासाठी एक तर काही काळ वाट पाहावी लागेल अथवा श्रीलंकन रुपयांत पेमेंट स्वीकारावे लागेल, असे सांगितले आहे.

आयएमएफसोबत सुरू राहील चर्चा -याच वेळी, बेलआउट पॅकेजसंदर्भात आयएमएफसोबत चर्चा सुरूच राहील, असे श्रीलंकन सरकारने म्हटले आहे. याशिवाय, श्रीलंकन सरकारने इतर देशांकडूनही द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यातच, देशाकडे असलेले सध्याचे परकीय चलन जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वापरले जाईल, असे श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे नवे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेवर कुणाचे किती कर्ज - श्रीलंकेवर असलेल्या एकूण कर्जाचा विचार करता, लंकेने 47 टक्के कर्ज बाजारातून घेतले आहे. तर चीनकडून सुमारे 15 टक्के, आशियाई विकास बँकेकडून 13 टक्के, जागतिक बँकेकडून 10 टक्के, जपानकडून 10 टक्के आणि भारताकडून 2 टक्के एवढे कर्ज घेतले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्थाchinaचीनJapanजपानIndiaभारत